कर्मचारी व वनमजूर शेतकऱ्याकडून लाच घेतांना अटक

 

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

गडचिरोली : सविस्तर वृत्त असे की आपल्या जबरान जोत जागेवर ट्रॅक्टर ने वाहून पारे टाकण्यासाठी अडथळा आणला जाऊ नये यासाठी एका शेतकरी व्यक्तीकडून 22, हजाराची लाच घेतांना वणरक्षकाला आणि वनमजूर ला रंगेहाथ पकडण्यात लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे.अटक करण्यात आलेल्या वणरक्षकाचे नाव रणजित प्रभुलाल कुडावले वय 50 वर्ष रा. रांगी आणि वनमजुराचे नाव देवराव रामचंद्र भोयर वय 52वर्ष रा. मुरमाडी असून दोघांविरुद्ध लाच प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.ही कारवाई लाच प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यशवंत राऊत,सहायक फौजदार प्रमोद ढोरे, व इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे