पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून घ्या अन्यथा आमरण उपोषण करू गोर सेनेचा इशारा

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

गोर सेना नि दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि पंचायत समिती आर्वी अंतर्गत खालील प्रमाणे लाभार्थी

लाभार्थ्याचे नाव

प्रमोद बद्री राठोड,नरेश शिवलाल राठोड,सुधाकर वातुलाल राठोड, प्रल्हाद चंपत राठोड ,दक नेलसग राठोड, अरुण चंपत राठोड

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रपत्र व मधील पात्र आहेत सदर लाभार्थी हे

अतिक्रमणाच्या जागेवरील असुन त्यांचेकडे सन २०११ च्या आधीचा रहिवाशी पुरावा सुध्दा आहे. सदर लाभार्थ्याचे अंतिक्रमण पक्के करण्यासाठी आम्ही वांरमवार पंचायत समिती व प्रकल्प संचालक आणी गामिण विकास यंत्रणा वर्धा व जिल्हास्तरावर

वांरवार भेट देवून पाठपुरावा करूनही त्या जागेवर कोणताही निर्णय झालेला नाही.

आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते कि सदर लाभार्थ्यांना जागेबाबत योग्य तो निर्णय घेऊन त्यांना झागा उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून सदर लाभार्थी वंचीत राहणार नाही

सदर बाबतीत १५ फेब्रुवारी २०२२ दिवसा पर्यत योग्य तो निर्णय न झाल्यास व लाभार्थ्यांना जागा उपलब्ध न करून दिल्यास गोरसेना वर्धा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांच्या नेतृत्वात या १६ फेब्रुवारी २०२२ आमरण उपोषण करण्यात येईल व आंदोलनाची सर्व जवाबदारी प्रशासनाची राहीन.

असे निवेदनात नमूद केले आहे