माधुरिताई खोब्रागडे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

 

गडचिरोली: नगर पालिकेच्या निवडणुकीत तीन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणाऱ्या, गडचिरोली शहरातील फुलेवार्ड येथील रहिवासी सौ.माधुरी खोब्रागडे यांचे अल्पशा आजाराने रात्रौ ला निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात कुटुंबात आई, पती, मुलगा, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.माधुरी खोब्रागडे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.