( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
बल्लारपुर : रामप्रताप रामआसरे निषाद हे भगतसिंग वर्ड पाण्याच्या टाकीजवळ, बल्लारपूर येथील रहिवासी आहे. ते त्यांचे नावे असलेल्या घराचा नगर पालिका बल्लारपूर येथे नियमित कर भरत आहे. त्यांचे घराचे आसपास असणारे लोक आपल्या घरचा कचरा घंटागाडीत न टाकता राहत्या घरासमोर आणून टाकतात. त्यात ओला आणि सुका कचरा समाविष्ट असतो. आठवड्यातून एकदा ट्रकटार येऊन कचरा घेऊन जाते.याचा रोज त्यांना व त्यांच्या परिवाराला त्रास होत आहे, आणि त्यातून निघणार्या दुर्घन्धिमुळे त्यांच्या परिवाराचे आरोग्य धोक्यात येत आहे.त्यांच्या घरासमोर सार्वजनिक बोरवेल सुध्दा आहे. याबाबत नगर पालिका बल्लारपूर ला दिनांक: 18/01/2020, दिनांक:24/01/2020, दिनांक:24/02/2020, दिनांक: 04/06/2020, दिनांक: 28/09/2020, दिनांक:07/12/2020, दिनांक:21/01/2021, दिनांक:08/02/2021 तसेच दिनांक:09/02/2021 ला विनंती पत्र देऊन निदर्शनास आणून दिले. परंतु त्यांचे कार्यालया कडुन काहिच कार्यवाही झाली नाही. कृपया आपण आपल्या स्तरावरून त्यांच्या घराच्या आसपासच्या लोकांना त्यांच्या घरासमोर कचरा टाकन्या पासून परावृत्त करुन न्याय मिळवून द्यावा. आभारी राहीन अशी विनंति श्री. रामप्रताप रामआसरे निषाद यांनी केली आहे