नक्षलवाद्यांकडून लग्नसमारंभात युवकाची गोळी झाडून हत्या

 

 

एटापल्ली, दि. २६ फेब्रुवारी:  एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी गावात लग्नसमारंभात जेवणावळी मध्ये बसलेल्या युवकाची नक्षल्याकडून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

 

अशोक कोरचामी वय २७ वर्ष रा. मंगोटा असे मृतक युवकाचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे आज दुपारच्या सुमारास पुरसलगोंदी या ठिकाणी लग्न समारंभ होता. मृतक युवक जेवण करायला पंगतीत बसला असताना मोटार सायकल वरून आलेल्या 2 नक्षलवाद्यानी युवकावर गोळ्या झाडुन हत्या केली असल्याची माहिती आहे.

 

मृतक युवकाची सासुरवाडी पुरसलगोंदी असल्याने लग्नकार्यासाठी या गावी आला होता. प्रथमदर्शनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची हत्या झाली असल्याची माहिती आहे.

अशोक कोरचामी हे वेत्त्वि एटापल्ली येथे मित्री काम करीत असे व तो पुरसगोंदी लग्न असल्याने त्यानी लग्नाला गेले असता मोटार सायकलीने दोन नक्षलवादी अशोक जेवन करीत असताना त्याच्या अंगावर गोळ्या झाडल्या व अशोक जागीच ठार झाला