हेमलकसा येथे पारंपरिक गोटुल समिती(ईलाक बैठक) संपन्न

भामरागड :काल दिनांक 20 फेबरूवारी 2021 रोजी मौजा हेमलकसा येथील गोटूल मध्ये भामरागड पट्टी पारंपरिक गोटूल समिती (इलाका बैठक) घेण्यात आली. या बैठकीत भामरागड तालुक्यातील ग्रामसभेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. तसेच पारंपरिक नेतृव करणारे पेरमा, भूमया, गायता, कोतवाल व जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी, पंचायत समिति सभापती गोई कोडपे, पंचायत समितेचे उपसभापती सुखराम मड़ावी, पंचायत समिती सदस्य इंदरशाह मड़ावी, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य इंदरशाह मड़ावी होते. या कार्यक्रमात भामरागड तालुक्यातील अनेक समस्या व मुद्द्यानवर चर्चा करण्यात आली. हे समस्या व मुद्दे पुढील प्रमाणे:

1. भामरागड तालुक्यातील माड़िया या अति असुरक्षित आदीम जमातीच्या शिक्षकांनी “माड़िया सेवा समिती” या नावाची एक संस्था 2006-2007 मध्ये तयार केली होती. पण या संस्थेच्या माध्यमक़तून कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. किंवा कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यावहार झाले नाही. सदर साथेचे सभासद हे शासकीय नौकरीत होते. त्याची बदली इतरत्र झालेली आहे. म्हणून या साथेच्या सदस्यांची एकमेकांशी समन्वय होत नाही. म्हणून सदर संस्था जनतेच्या स्वाधीन करावे असे संस्थेच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

2. तेंदू व बांबू विक्रियाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बांबूचे प्रति बंडल 130.00 रुपये व एक लांब बांबूची कीमत 60.00रुपये तसेच प्रति टन 4700.00 असे जनतेच्या वतीने कीमत ठरविन्यात आले.

3. या प्रासंगी तेन्दूविषयीही चर्चा करण्यात आली. तेन्दू प्रति शेकडा 1200.00 रुपये असे सर्वसंमतीने टरविन्यात आले. आणि प्रत्येक ग्रामसभेने 1% इलाक़ा ग्रामसभेमध्ये रक्कम जमा करण्यासबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.

4. ग्रामसभेच्या सक्ष्मीकरन विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

5. परवानगी न मिळाल्याने “भव्य किसान मोर्चा” रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले.

6. 10 मार्चला “महिला दिवस” व “सावित्रीबाई फुले स्मृति दिवस” साजरा करण्याचे टरविन्यात आले.

7. कोणत्याही शासकीय कामावर गेलेल्या मजूराला रोजी 500.00 रुपये देण्यात यावे. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

8. मौजा बेजूर ते बाबलाई देवस्थान पर्यन्त पक्का रास्ता करावे. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

9. “सांज माड़िया” या संस्थेचे संस्थापक श्री. गोंगले हे “माड़िया” या शब्दाचा वापर करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघानुसार जमातिच्या परनगिशिवाय अश्या पसद्धतीने वापर करता येत नाही. शिवाय आदिवासी जमातीच्या व्यक्तीचे त्याच्या लेखी परवागिशिवाय त्याचे फ़ोटो काढन्याचा अधिकार कोणालाही नाही. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

10.”परिसर हक्क” (Habitat Right) या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

इत्यादि मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.