आलापालीचा नवनियुक्त सरपंचांनी केलं कामाला सुरुवात 

 

  अनिकेत खरवडे

                          आलापल्ली येथील नवनियुक्त सरपंच शंकर मेश्राम आणि नवनिर्वाचित ग्रा. यांनी कामाला सुरुवात केली आहे… सरपंच पदाची नियुक्ती होताच शंकर मेश्राम यांनी गावातील स्वच्छतेकडे लक्ष देत स्वतः ट्रॅक्टर चालवत सफाई कामगारांना प्रोत्साहित केले…  

गावातील सहा बोरिंग पडलेले दोन दिवसात दुरुस्त केले आणि उर्वरित पंधरा बोरिंग दुरुस्त करण्याचा प्रयत्नात आहेत. येत्या उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये याची दक्षता घेत गावाच्या विकास कामाला पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली. सरपंच आणि सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या कामाची ग्रामस्थांकडून स्तुती करण्यात येत आहे..