आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर योग्य कारवाही करण्यासाठी मागणी

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली,नागपूर विभाग द्वारा भिवापूर तालुक्यातील मांगरुड येथील जय भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था,उमरेड द्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळा येथील १५ आदिवासी विद्यार्थ्यांना जेवणातून विष बाधा झाल्याप्रकरणी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर योग्य कार्यवाही करून,भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा यांची नियमित तपासणी करण्यात यावी अशी मागणी मा. सावन कुमार,प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नागपूर यांना भेटून करण्यात आली,त्यावर त्वरित कार्यवाहीचे निर्देश मा.प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.त्याचप्रमाणे न्यु.बजेट योजना लाभार्थी वाटप माहिती,आदिवासी बचत गट लाभ वाटप माहिती,शासकीय वसतिगृह प्रवेश व अडचणी,अखर्चित निधी, खावटी अनुदान योजना लाभार्थी सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,यावेळी परिषदेचे विभाग अध्यक्ष दिनेश शेराम,ग्रामीण अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम(मसराम),स्वप्नील मसराम,राहुल मडावी,सुरेंद्र नैताम,विजय परतेकी प्रामुख्याने उपस्थित होते.