मुलचेरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर राका ची सत्ता

 

पूजा दब्बा / प्रतिनिधी

मुलचेरा– विविध ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सरपंच-उपसरपंच निवड कार्यक्रम जाहीर झाला. यावेळी अहेरी विधानसभाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात, श्री ऋतुराज जी हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री भाग्यश्री ताई आत्राम आणि जिल्हा परिषद गडचिरोली बांधकाम सभापती युद्दिष्टर विश्वास यांच्या परिश्रमाने मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता विविध ग्रामपंचायत मध्ये स्थापन झाली.

यामध्ये ग्रामपंचायत येल्ला, लगाम, कोठारी, विवेकानंदापूर, सुंदरनगर, बोलेपल्ली या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच तसेच उपसरपंच निवडून आले. त्या सर्वांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कौतुक केले.