
आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने मेक इन गडचिरोली चा उपक्रम
गडचिरोली जिल्हातील चामोर्शी येथे एकत्रित सत्तर अगरबत्ती मशीन संच सहित भव्य अगरबत्ती प्रकल्प
*!! शहरातील 300 बेरोजगारांना प्रकल्प उद्घाटन सोहळा नंतर रोजगारास प्रारंभ!!* …..
*!! संताजी नगर येथील युवा नेतृत्व आशिष भाऊ पिपरे यांची मेहनत व शहरात रोजगाराचे दालन उघडण्यासाठी सर्व स्तरातून कौतुक!!*…
*चामोर्शी – 10/2/2021* *गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. देवराव होळी साहेब यांच्या प्रयत्नातून, मार्गदर्शनाने गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाची निर्मिती व्हावी व जिल्हा उद्योगशील व्हावा प्रत्येक गावात रोजगाराचे दालन उघडले जावे*
*या दृष्टीने मेक ईन गडचिरोलीच्या संकल्पनेतून मुख्य प्रवर्तक डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने व बँक ऑफ महाराष्ट्र*
*शाखा – चामोर्शी, खादी व ग्रामोद्योग मंडळ, गडचिरोली व जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या सहकार्याने निर्मित महाराष्ट्रातील सर्वाधिक सत्तर एकत्रित मशीन व सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेल्या शिवम ब्रँड नावाने अगरबत्ती सेलिंग व मार्केटींग करणारी विदर्भातील एकमेव सर्वात मोठ्या अगरबत्ती प्रकल्पाचा भव्य शुभारंभ सोहळा*
*दिनांक 12/2/2021ला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे या प्रभागातील युवा नेतृत्व उद्योजक आशिष भाऊ पिपरे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या प्रभागातील शेकडो महिला भगिनी यांना रोजगार निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले*
*व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सबसिडी वर कर्ज मंजूर करून बँक ऑफ महाराष्ट्र येथे पाठवून सर्व 100 महिलांचे कर्ज मंजूर केले व बँक ऑफ इंडियाच्या आर,से, टी,चे वतीने सर्व महिला भगिनी यांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देण्यात आले व आज सत्तर मशीन उपलब्ध झाले*
*उर्वरित तीस मशीन लवकरच उपलब्ध होणार आहेत हा संपूर्ण प्रोजेक्ट जवळपास पाच कोटी रुपयांचा आहे ब्रॅण्डिंग व मार्केटींग करिता स्वतःची ऑफिस इमारत तयार करण्यात आली आहे*
*व विशाल लोखंडी शेड उभारले गेले आहे , आज या अगरबत्तीचा प्रोजेक्ट मुळे शहरातील 300 बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे, सध्यातरी हा अगरबत्ती प्रकल्प संपूर्ण विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प आहे*
*या अगरबत्ती प्रकल्प मधे प्रकल्प स्वतः अगरबत्तीचा सुगंधित मसाला तयार करणार आहे या आत्याधूनिक शिवम अगरबत्ती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक या प्रभागातील युवा नेते आशिष पिपरे यांचे संपूर्ण शहर वासियंच्या वतीने कौतुक केले जात आहे* *या प्रकल्पाचे उद्घाटक*
*मेक इन गडचिरोलीचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. देवरावजी होळी साहेब*
*(६८ गडचिरोली विधानसभा क्षेत्र)*
*यांच्या शुभ हस्ते आणि*
*सन्माननीय जिल्हाधिकारी दिपकजी सिंगला साहेब जिल्हाधिकारी, जिल्हा गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात* *आला आहे या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र चे* *झोनल मॅनेजर , बँक ऑफ इंडिया आर, से, टी, चे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक* *खादी ग्रामोद्योग मंडळ अधिकारी प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक चौधरी साहेब व पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत* *कार्यक्रम स्थळ अगरबत्ती प्रकल्प चामोर्शी च्या बाजूला संताजी क्रीडांगण, संताजी नगर, प्रभाग क्रमांक ०३, गोंडमोहल्ला, चामोर्शी ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली* *समस्त अगरबत्ती प्रकल्प संचालक आशिष अरूण पिपरे*, *चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के, ओमदास कवडुजी झरकर व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या अगरबत्तीचा प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे* ,