उप पोस्टे पेरमिली च्या प्रांगणात भव्य आरोग्य मेळावा व सत्कार समारंभ संपन्न

 

 

मुख्य संपादक /अनिकेत खरवडे

 

गडचिरोली पोलीस दल अंतर्गत उप पोस्टे पेरमिली यांच्यावतीने भव्य आरोग्य मिळावा घेण्यात आला. तसेच पोस्ट हद्दीतील मौजा कोरेली गावचे सुपुत्र मा. विलास गावडे यांची UPSC मधून असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कारही आयोजित करण्यात आला. नक्षलग्रस्त अतिदुर्गम संवेदनशील भागामधील सर्वसामान्य लोकांना या मेळाव्याचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ झाला. सदर मेळाव्यास अस्थिरोग तज्ञ डॉ. अप्रतिम दीक्षित डॉ. सी.बी.सलुजा, डॉ. ईशान तुरकर वैद्यकीय अधिकारी पेरमिली यांनी सहभाग घेऊन योग्य पद्धतीने उपचार केला व मोफत औषध वाटप केले. या कार्यक्रमात वन विभागाकडून ही वन विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांना देण्यात आली. या कार्यक्रमात मा. हरिचंद्र शर्मा असिस्टंट कमांडंट सीआरपीएफ मा. पवार साहेब आर.एफ.ओ. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीएसआय धनंजय पाटील यांनी केले आभार पीएसआय धवल देशमुख यांनी मांडले.