पारंपरिक ईलाका गोटूल समिती भामरागड तथा ईलाका ग्रामसभांचे विद्यमाने भूमकाल दिवस मौजा नेलगुंडा येथे साजरा

प्रतिनिधी/ पूजा दब्बा

   भामरागड :आपले अस्तित्व, अस्मिता, आत्मसन्मान, आपले अधिकार करिता शहीद वीर योध्दा गुंडाधुर यांचे भूमकाल दिवसाच्या निमित्ताने भामरागड तालुक्यातील सर्व जनता एकत्र येऊन आनंदाने मांजरी ढोल,भोगाम ढोल, हकुमि, रेला नृत्य सादरीकरण केले.

छत्तीसगढ बस्तर क्षेत्रात या दिवसाचे खूप मोठ्या उत्साहाने प्रत्येक ठिकाणी भूमकाल दिवस साजरा करण्यात येतो तसेच बस्तर छत्तीसगढ शासनातर्फे तिरकमान या खेळाचे विजेत्यांना गुंडाधुर अवॉर्ड नावाने दिला जातो.

गुंडाधुर यांचे बलिदान आदिवासी बांधवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जल जंगल जमीन अधिकार व आत्मसमानाने जगण्याचा अधिकार, एकता टिकवून ठेवण्यासाठी आपले प्राण पणाला लावले आहे त्यामुळे राष्ट्रीय भूमकाल दिवस साजरा करतात

    यावेळी नेलगुंडा येथील भूमकाल दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लालसू नोगोटी जि प सदस्य गडचिरोली यांनी अध्यक्षीय भाषणात विस्थापन, परिसर हक्क, वनहक्क , या विषयावर संबोधन केले.कार्यक्रमाचे उदघाटक सौ गोई बलदेव कोडापे (सभापती प स भामरागड), आपले अस्तित्व ,पेसा कायदा अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा अमल करण्यासंबंधी संबोधन केल्या.प्रमुख पाहुणे सौ ग्यानकुमारी कौशी जि प सदस्या गडचिरोली यांनी महिला सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन केल्या, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री बंगरू गावडे (शिक्षक) यांनी आपली संस्कृती जतन ,आपले एकता ,मिळालेल्या कायद्यांचे अमल करण्यासंबंधी वक्तव्य केले.सौ भारती इष्टाम (समाजसेविका), यांनी व्यसनमुक्ती ,महिला सशक्तीकरण बाबतीत संबोधले.श्री बिचू वड्डे(शिक्षक) धर्मांतरण,शिक्षण,बौद्धिक विकास बाबतीत संबोधले,श्री मुरा आतलामी(ग्रामसभा अध्यक्ष हलवेर),राजश्री लेकामी(अंगणवाडी सेविका),भारती मज्जी(सरपंच नेलगुंडा)तथा उपसभापती श्री सुखराम मडावी सह परायणार ,नेलगुंडा, येथील सर्व ग्रा पं सदस्य, तथा सर्व ग्रामसभेतील गायता भूमया, पेरमा, मांझी, ग्रामसभा अध्यक्ष सचिव तथा ग्रामस्थांकडून शांतपणे भूमकाल दिवसाचे कार्यक्रमाचे समारोप घेण्यात आले ,सूत्र संचालन चिंना माहका यांनी केले