चंद्रपूर:
महा कृषी ऊर्जा धोरण २०२० अभियान आणि वीज बिल भरण्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी महावितरण कंपनीतर्फे बुधवारी सायकलने जनजागृती रॅली काढण्यात आली. महावितरणाच्या चंद्रपूर परिमंडळ द्वारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
महा कृषी ऊर्जा धोरण २०२० अभियानांतर्गत विवीध योजनांच्या इत्यंभूत माहितीबद्दल जनजागृती करण्यासाठी, वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखणे संबंधी जागृती होण्यास वाहनांच्या संख्येमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सायकली च्या माध्यमातून पर्याय साधने ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन मा कृषी ऊर्जा धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सुधारित थकबाकी व व्याज व दंड मागून थकबाकी होण्याचे योजनेबद्दल जनजागृती होण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या पुढाकाराने महावितरण चंद्रपुर परिमंडळ द्वारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले
महावितरणला थेड सावत असलेल्या थकबाकीच्या समस्येवर ग्राहकाला आव्हान करून विज बिल करण्यासंबंधी आव्हान करण्यात आले.
प्रमुख मार्गाने सायकल रॅली निघाली.
रॅलीत अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते अधीक्षक अभियंता संध्या चिवडे, सुभाष म्हेत्रे, अधीक्षक अभियंता सुशील विखार, योगेश गोरे, विजय चावरे, महेश तेलंग, यांची उपस्थिती होती.