आम आदमी पार्टी, .जिल्हा गडचिरोली………….. पेट्रोल-डीझेल भाववाढी विरुद्ध आप चे राज्यव्यापी धक्का मारो आंदोलन

*उप संपादक // शुभम खरवडे
 
पेट्रोल आणि डिझेलच्या कर कपातीची ‘आप’ ची मागणी*
 
‘ या सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी !’ ,
 
*‘मोदी सरकारकडे करा अर्ज, पेट्रोल डीझेलसाठी द्या आम्हाला कर्ज’*
 
 
 
पेट्रोलचे दर शतकी वाटचाल करत असताना केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल,
डीझेल वरच्या अबकारी कर सवलतीची अपेक्षा पूर्ण फोल ठरली आहे. त्यामुळे
पेट्रोल– डीझेल वरच्या अबकारी करत मोठी कपात करावी अशी मागणी करत आम आदमी जिल्हा गडचिरोली
पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ..दि 4 फरवरी 2021..आज तीव्र आंदोलन केली.
‘मोदी सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी!’ , ‘मोदी सरकारकडे
करा अर्ज , पेट्रोल डीझेलसाठी द्या आम्हाला कर्ज, रावणाच्या राज्यात ५१
रुपये तर रामाचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या सरकारचे भाव ९३, ‘ अश्या
घोषणा दिल्या. त्यास नागरिक ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते.
 
 
 
मागच्या वर्षाच्या सुरवातीला पेट्रोल चे भाव ७८ रुपयाच्या जवळपास होते.
कोरोना काळात सर्वच व्यवहार थांबले होते. लॉकडाऊनमुळे वाहतूक पूर्ण बंद
होती. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ओईल ला घेवालाच नव्हते, त्यामुळे
क्रूड ओईल चे भाव अगदी खालच्या स्तरावर पोहचले आहेत. तरीही जनविरोधी मोदी
सरकार कडून महामारीच्या काळात पेट्रोल-डीझेल वरील अबकारी कर मोठ्या
प्रमाणात वाढवून जनतेला लुटण्याचे महान कार्य हे सरकार करीत आहे. त्या
वाढीव कराची झळ आता सामान्य माणसास झळ बसत आहे .
 
 
 
पेट्रोल- डिझेलमध्ये झालेल्या या भाववाढीमुळे आम आदमी यांना
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना आता करावा लागत आहे. ‘जागतिक
पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या, २००८ जुलै मध्ये प्रती
बरल १४२ डॉलर तर २०१२ फेब्रुवारी मध्ये प्रती बरल १२५ डॉलर होत्या त्या
आता केवळ ५५ डॉलर वर आहेत. याचा फायदा जनतेला थेट स्वरुपात दिला असता तर
अर्थ व्यवस्थेला थोडी उभारी मिळू शकली असती. सामान्य जनतेच्या खिशाला
आधार देण्या ऐवजी महागाईचा फटका जनतेला आणि आर्थिक सवलती अंबानी-अदानी
सारख्या काही मोठ्या उद्योजक मित्रांना असे मोदी सरकारचे उफराटे धोरण
आहे.’ असे या वेळेस.आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे.यांनी सांगितले.
 
 
 
२०१४ मध्ये पेट्रोल वरचा अबकारी कर – एक्साईज ९.२० रुपये होता, तो २०१७
मध्ये २१.४८ रुपये झाला आणि आता केंद्र सरकार तब्बल एक लिटर पेट्रोल मागे
३२.९८ रुपये तर डीझेल वर प्रती लिटर ३१.८३ रुपये कर लावण्यात येत आहे.
तसेच राज्य सरकार VAT च्या माध्यमातून पेट्रोल वर२८.९८ आणि डीझेल वर
१९.६६ रुपये आकारणी करते, त्यामुळे आज राज्यात मूळ २७.७५ रुपये प्रती
लिटर च्या पेट्रोलची विक्री किंमत ९२.५० तर डीझेल ची किंमत ८२.६८ पर्यंत
पोहचली आहे. केंद्र सरकार आकारत असलेला अवाजवी अबकारी कर कमी करावा अशी
मागणी आम आदमी पार्टीने आंदोलनच्या माध्यमातून केली आहे.
 
या वर्षीच्या केंद्रीय अर्थ संकल्पात केंद्र सरकार मध्यमवर्गीय माणसाला
दिलासा देवू शकले असते परंतु सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही.
लॉकडाऊन मुळे आलेल्या आर्थिक मंदीनंतर आता महागाईच्या ओझ्याखाली गरीब
जनता दबून जाणार आहे.
 
दुसरीकडे आप चे सरकार असलेल्या दिल्लीत पेट्रोल ची विक्री किमत ८६.३०
प्रती लिटर आहे. हा दर महाराष्ट्रातील पेट्रोल दरापेक्षा तब्बल ६.१०
रुपयांनी कमी आहे. याचे कारण महाराष्ट्र सरकार आकारत असलेल्या व्हॅट
सुद्धा जास्त आहे. दिल्ली सरकारच्या दीडपट कर महाराष्ट्र सरकार आकारते.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारची इच्छा शक्ती असेल तर ते सुद्धा सामान्य
जनतेस दिलासा देऊ शकते.
 
 
 
आज गडचिरोली शहरात .. यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे तीव्र आंदोलन करण्यात
आले, या आंदोलनात आम आदमी पार्टीचे
..आप कामगार अध्यक्ष चोखर्जी अबादे , ट्रान्सपोर्ट अध्यक्ष रमेश उपलवर ,रुपेश सावसाकडे संजय जीवतोडे, अनुरथ निलेकर ,..कोमेश कंट्रोजवर ,सुरेश गेडाम, सुनील तामशेट्टीवार ,पुंजाराम शेंडे…………………………… इत्यादी पदाधिकारी व
कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यांच्या घोषणांना सामन्य
नागरिकही साथ देत होते