वार्षीक स्नेहसंम्मेलनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन तनुश्री आत्राम यांच्या हस्ते संपन्न

खबरदार महाराष्ट्र ऑनलाईन न्युज नेटवर्क

अहेरी;- दि.27/01/2023 ला डि.बी.ए.पब्लिक स्कुल,अहेरी या शाळेच्या 9 दिवसीय दुसऱ्या आंतरशालेय क्रिडा महोत्सव व वार्षिक स्नेहसंम्मेलनाला सुरुवात झाली.या कार्यक्रमाची सुरुवात मशाल रॕलीने झाली.या कार्यक्रमाचे उद्घाटन डि.बी.ए.पब्लिक स्कुलच्या अध्यक्षा तनुश्री आत्राम यांनी केले.क्रिडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी खो-खो,कॕरम,बुद्धीबळ,धावणी स्पर्धेने सुरुवात झाली.यावेळी भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम,अहेरी पोलीस ठाण्याचे PSI अप्पासाहेब रोकडे साहेब, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.या क्रिडा महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.