एटापल्ली;-आज एटापल्ली येथे शहर संघटन सदस्य च्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ वंदना गावडे हे होत्या तर प्रमुख उपस्थितीत सौ गीताबाई मोहुर्ले सौ. चीनक्का पिल्लीवार, पोलीस स्टेशन एटापल्ली चे पोलीस उपनिरीक्षक सविता काळे , आर आर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस बंडावार,व शिक्षक व मुक्तीपथ तालुका संघटक श्री किशोर मलेवार, तालुका प्रेरक श्री रवींद्र वैरागडे, स्पार्क कार्यकर्ती कू रुणाली कूमोटी हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ वंदना गावडे यांनी शहरात खर्राबंदीं सोबत संपूर्ण दारू बंदी आवश्यक आहे असे असे सांगितले तर पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांनी आपले मार्गदर्शनात शहरातील खर्राबंदी अधिक कडक करून एटापल्ली शहर संपूर्ण दारू व खर्राबंदी ची अमलबजावनी करून आपण सर्व शहर वासीयांचे शहाकार्याने दारू व खररामुक्त शहर करू असे आश्वासन दिले.या शहर संघटन बैठकीत खर्राबंदी ची यशस्वी अमलबजावणी केल्याबद्दल शहर संघटन च्या वतीने पोलीस स्टेशन चे अभिनंदन केले .