अंगणवाडी सेविकेला अज्ञातानी तोंडाला व हाताला दोरी बांधून जंगलात सोडले

 

जिल्हा प्रतिनिधी इशांक दहागावकर //खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क

राजाराम (खाँदला )पासून 5 कि.मि.अंतरावर असलेल्या मौजा पत्तीगाव येते बाल विकास प्रकल्प अतंर्गत मिनी अंगणवाडी केंद्र सुरू असून अंगणवाडी सेविका म्हणून राजाराम (कोंकापरी )येतील रहिवासी असलेल्या श्रीमती सुरेखा सुरेश आलाम हि अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून दिनांक १४/१/२०२३ ला अंगणवाडीत जातो म्हणून घरून निघून गेली होती मात्र परत आली नव्हती त्यामूळे नातेवाईकांनी शोधाशोध केली मात्र आढळली नव्हती त्यामूळे राजाराम येतील उपपोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती.मात्र दिनांक १५/१/२०२३ ला सायंकाळी गावात आली मात्र दोन्ही हात मागे करून दोरीच्या सहाय्याने बांधून होते आणि सदर महिला जखमी अवस्थेत होती त्यामूळे तिला अहेरी येतिल उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचं माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रूग्णालयात भेट देवून घडलेली घटनेची व तब्बेतीची विचारपूस केली.यावेळी विलास सिडाम नगर सेवक अहेरी, महेश लेकुर् ग्रा. पं. सदस्य,बाळू ओड्डेटीवार, नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक उपस्थीत होते.