आ. समीर कुणावार यांचे हस्ते नंदोरी सर्कल मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

 

४.९२ कोटी निधीतुन डोंगरगाव येथील पोथरा नदीवरील पुलाची लवकरच होणार निर्मिती.

हिंगणघाट प्रतिनिधी,दि.३०
हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्रात आ.समिर कुणावार यांच्या विकासकामांचा झंझावात सर्वत्र दिसुन येत आहे.
आज दि.३० रोजी समुद्रपुर तालुक्यातील नंदोरी सर्कलमधे विविध योजनेंअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन आ. समीर कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
नाबार्ड,जिल्हा परिषद, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत तसेच आमदारनिधीतुन आज दि.३० रोजी सुमारे ६ कोटि,४७ लाख रुपये फंडातुन नंदोरी सर्कल मध्ये अनेक विकासकामे मंजुर करण्यात आली असून डोंगरगाव येथील पोथरा नदिवरिल पुलाचे भूमिपूजन आ.समिर कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
उपरोक्त पुलाच्या निर्मितीसाठी परिसरातील गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती,या मागणीची दखल घेऊन आ.समिर कुणावार यांचे प्रयत्नामुळे सुमारे ४ कोटि ९२ लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला असून आज या पुलाचे भूमिपूजन संपन्न झाले,याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण तथा आरोग्य सभापती सौ.मृणाल माटे , समुद्रपुर प.स.सभापती सौ.सुरेखा टिपले, पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे , जिल्हा परिषद सदस्या सौ.शुभांगी डेहणे,समुद्रपुर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे,प.स.सदस्य शांताराम बगडे,डोंगरगाव येथील सरपंच संजय वरघणे,उपसरपंच सुभाष चन्दनखेड़े,माजी प.स.सदस्य वामन चन्दनखेड़े , पोलीस पाटील राजू दांडेकर , गोविंदपुर येथील सरपंच शारदा तुमडाम, नंदोरी येथील सरपंच संजीवनी राऊत, उत्तम बावणे, बालू इंगोले ,संकेत गवळी, उमेश चंदनखेडे, कैलास टिपले इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
उपरोक्त महत्वाचे विकास कामांसोबत नंदोरी सर्कलमधील इतर १४ कामाचे भूमिपूजनसुद्धा आमदार कुणावार यांनी केले,यात ३० लक्ष रुपये निधितुन पाठर ते आरंभा रस्त्याचे डांबरीकरण, ५ लक्ष रुपये नंदोरी येथील बुद्ध विहार परिसरात पेविंग ब्लॉक्स लावणे ,४० लाख रुपये ख़र्च करीत वासी ते आसोला रस्त्याचे डांबरीकरण,१५ लाख निधीअंतर्गत पावनगाव ते करुळ सीमेंट कॉन्क्रेटीकरण तसेच १२ लाख रूपयातून करुळ रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय माजी पं. स. सदस्य वामनरावजी चंदनखेडे यांनी केले व संचालन तसेच आभार प्रदर्शन डोंगरगाव येथील पोलीस पाटील राजूभाऊ दांडेकर यांनी केले.
उपरोक्त कार्यक्रमाचेवेळी संबंधित विभागाचे अधिकारी,कंत्राटदार तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य गण व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.