स्वच्छक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

 

गडचिरोली ; एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा लढा सुरू असताना, आता एक स्वच्छक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद मृत्यू झाल्याची घटना काल घडली.
कोरोना काळात आपली आर्थिक अडचणीत कसाबसा मार्ग काढत, एस टी बस चे कर्मचारी विलगिकरण च्याआंदोलन मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत अडकून पडलेल्या परिस्थितीत कर्मचारी सरकार काहीतरी उपाययोजना करेल या आशेवर जगत आहे.
राजेंद्र उंदरे नावाचा हा कर्मचारी अहेरी डेपो मध्ये चालक होता,पण गेल्या वर्षी राजेंद्र ला लकव्याचा झटका आल्याने बस चालविण्यासाठी योग्य नसल्यामुळे, त्याला स्वछक कर्मचारी म्हणून कामावर रुजू करण्यात आले होते.
काल 28/1/2022 शुक्रवाऱ रोजी अचानक ह्रदयघाताचा झटका आल्याने राजेंद्र चा दुःखद मृत्यू झाल्याने एस टी महामंडळाच्या समस्त कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.
एस टी महामंडळाच्या वतीने सरकारी मदत म्हणून अंतिम विधिकरिता फक्त पाच हजार रुपयांची मदत दिली असल्याची माहिती अहेरी डेपो चे प्रबंधक राठोड यांनी दिली आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला आपल्या कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू मुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असल्याचे विदारक चित्र आता दिसून आले आहे.
मागील तीन महिन्यापासून आर्थिक अडचणीत सापडलेले सर्व कर्मचारी विलगिकरणाच्या मागणीसाठी आंदोलन काळात ठाम