पालकमंत्र्यांकडून गांधीजींच्या पुतळयाला सुतमाला अर्पण करुन अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
वर्धा, दि.30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला सुतमाला अर्पण करुन अभिवादन केले. सामुहिक संकल्प व आदरांजली कार्यक्रमास देखील उपस्थिती दर्शविली. यावेळी, हेमलता मेघे, सुधिर पांगुळ, मनोज चांदूरकर, शिरीष गोडे यांची उपस्थिती होती.
सेवाग्राम येथील बापुकुटी येथे प्रार्थना सभेस उपस्थित राहून महात्मा गांधी यांना अभिवादन केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एस.प्रभू, मनोज चांदूरकर, शिरिष गोडे, हेमलता मेघे यांची उपस्थिती होती.