वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित प्रस्तावा करीता शासनाला दिले नागरी समितीने कठोर स्मरण पत्र

 

तालुका प्रतिनिधी// कारंजा धिरज कसारे

आता निवडणूक संपली ! पाणीपुरवठा योजना मंजूर करा

आता खूप झाली निवेदने, नागरी समितीने दिले आंदोलनाचे संकेत

कारंजा ( घा.) शासन दरबारी धूळ खात पडलेला शहरातील 14 कोटीचा वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना कठोर स्मरण पत्र देऊन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून कारंजा शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा ,पावसाळा किंवा हिवाळा असो पाणी समस्या ही नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.कारंजा शहरात सहा वर्षांपूर्वी नगरपंचायत ची स्थापना झालेली आहे, नगराचा विस्तार झालेला आहे. परंतु नागरिकांना मात्र नियमित आणि स्वच्छ पाणी मिळत नाही.
नगरातील काही वार्ड मध्ये चार ते पाच दिवसांच्या अंतरावर नळ येते. कार प्रकल्पात पुरेसा पाण्याचा साठा असून सुद्धा पाणी वितरण यंत्रणा व जलशुद्धीकरण केंद्र फार जुने आणि कमी क्षमतेचे असल्याकारणाने बऱ्याचदा कारंजा शहरातील नागरिकांना मात्र कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
नगरपंचायतने सप्टेंबर 2019 मध्ये 14 कोटीचा वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहेत. सदर प्रस्तावाला वन विभागाची, पाणी आरक्षणाची मान्यता मिळाल्याचे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु अजूनही काही तांत्रिक अडचणी असल्याचे कळविले. परंतु या तांत्रिक अडचणी किती दिवस ऐकायच्या असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नागरी समस्या संघर्ष समितीने पाणी समस्येच्या संदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने ऑन लाईन सर्व्हे केला आहे. पालकमंत्र्यांना निवेदने व स्मरण पत्र दिले. महिलांचा घागर मोर्चा काढला, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सुद्धा सदर प्रश्न मांडला. एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावे हाही उपक्रम केला.परंतु प्रशासन मात्र आंधळ्याच्या भूमिकेत आणि लोकप्रतिनिधी कडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
आता नगरपंचायत निवडणूक संपली, आचारसहिता संपली. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला नाहीत तर नागरी समितीने मुख्यमंत्र्यांच्या नावे कठोर स्मरण पत्रातून आंदोलनाचे संकेत दिले आहे.
कठोर स्मरण पत्र देते वेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.