कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथून दुचाकी चोरणारा चोरटा पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जाळ्यात

 

फिर्यादी श्री रितेश जवाहर जयस्वाल, रा. गांधी नगर वर्धा यांचा भाऊ कस्तुरबा रुग्णालयात उपचारा करिता भरती असल्याने फिर्यादी हे दि.१५-०१-२०२२ रोजी त्यांच्या होन्डा अॅक्टीवा क्र. एमएच-३२/एक्स-६८२९ या दुचाकी ने जेवणाचा डब्बा घेवुन कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे गेले व स्टाफ पार्कीग मध्ये दुचाकी पार्क करुन आत गेले व काही वेळाने परत त्यांचे दुचाकी जवळ आले असता त्यांची होन्डा अॅक्टीवा दिसुन आली नाही सदर दुचाकीचा इतरत्र शोध घेतला परंतु मिळुन न आल्याने फिर्यादी यांनी त्यांची होन्डा अॅक्टीवा चोरी गेल्याची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अप.क्र. ५६ /२०२२ कलम ३७९ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आरोपी नामे दिवाकर उर्फ आशिष भरत नेहारे, वय २२ वर्ष, रा. केळझर यास अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यात चोरी गेलेली होन्डा अॅक्टीवा क्र. एमएच-३२/एक्स-६८२९ पांढऱ्या रंगाची कि. २५,०००/- रु. जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे, पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार हरिदास काकड, गजानन कठाणे, जयेश डांगे, पोशि पवन झाडे अभय ईगळे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर शाखेचे निलेश कट्टोजवार यांनी केली.