ज्येष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मंगलाताई ठक यांचा नेवासा दौरा संपन्न.

 

मंगलाताई ठक यांचा समवेत जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संगर्षंन समिती , रेवणनाथ जी देशमुख महाराष्ट्र उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अहमदनगर चंद्रशेखर कडू पाटील यांच्या समवेत मंगल ताई देशमुख यांनी निराधार लोकांसाठी महाराष्ट्रभर फिरून काम करत असताना जगप्रसिद्ध प्रतिष्ठान शिर्डी , कोपरगाव स्वामी देवस्थान तथा नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर मंदिर , मोहिनी धारण मंदिर, देवगढ , शनी शिंगणापूर महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रतिष्ठानची भेटी देवून दर्शन घेतले तसेच शिर्डी येथील बैठकीत श्री काच्रू पाटील पवार यांची संघटनेच्या महाराष्ट्र सल्लागार पदी तर नाजिर शेख यांची अहमदनगर जिल्ह्याच्या संघटक पदी नियकती केली या दिऊर्यच्या दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगलाताई यांचे शोळ श्रीफळ देवून कार्याबद्दल सत्कार करण्यात आले .

त्या अनुषंगाने नेवासा येथील शरणपूर आश्रम येथे मंगलाताई ठक यांनी भेट देऊन वृद्धाच्या अडचणी जाणून घेतल्या व सरकार पातळीवर वृद्धांसाठी योजना राबवली जाणार असल्याचे सांगितले व वृद्धांसाठी राज्यभर काम करत असल्याचे असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले.
तसेच पुढे म्हणाल्या की नेवासा येथे येऊन खूप आनंद वाटला देवगड देवस्थान चे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे दर्शन करण्याचे लाभ झाला .तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली त्या पावन भूमीचे दर्शन घडले यात आनंद वाटला देवगड देवस्थान चे गुरुवर्य भास्करगिरी महाराज तसेच माऊलींचे दर्शन घेऊन पुढील काळात योग्य काम करनार असल्याचेही बोलताना भावना व्यक्त केल्या.ह्या वेळी सुधीर चव्हाण, बाळासाहेब दिवखिळे, परवेज पठाण, सोनकांबळे, राजू परदेशी, बन्सी सातपुते,
न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली.सोबतच मंगला ताई ठक यांनी लिहिलेले पाठभर जखमा एक सत्य कथन हे पुस्तक मान्यवरांना भेट दिले