जानेवारी च्या या तारखेला होणार शाळा चालू

 

 

कोरोना पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या.मात्र शाळा सुरू कराव्या अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती.त्यामुळे राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव दिला होता. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पण स्थानिक प्रशासनाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात यावा असेही या प्रस्तावात म्हटले आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.त्यामुळे येत्या 24 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत.