निवळणुकीच्या निकालानंतर 2 गटात राडा महिलेचा मृत्यू

 

#Khabardarmaharashtra,online letest news, social#political#crime#corona#

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच धुळ्यातील साक्री येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. जल्लोष सुरू असताना दोन गटांत किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मोहिनी जाधव असं या महिलेचं नाव आहे. त्यांचा भाऊ गोटू जगताप शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत.

मोहिनी जाधव या वाद सोडवत असतानाच त्या अचानक खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिनी जाधव यांचा मृत्यू भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला. याच वेळी त्या परिसरातून शिवसेनेचे कार्यकर्ते बाईकने जात होते. त्या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. यावेळी मोहिनी जाधव या सुद्धा वाद सोडवण्यासाठी तेथे आल्या.