पाथरी येथील पोलिस कर्मचाऱ्यावर ब्रम्हपुरी येथे गुन्हा दाखल…

प्रतिनिधी // कृनाल राऊत

ब्रह्मपुरी: पाथरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची व खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना आज दिनांक 19 डिसेंबर रोजी उघडकीस आली.

अत्याचार करणाऱ्या आरोपी पोलिस शिपायाचे नाव लालश्याम बाबुराव मेश्राम वय (५१) असे आहे. सध्या आरोपी पाथरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचे विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी लालश्याम मेश्राम याच्या विरोधात कलम अप क्र.३०/२०२२ भारतीय दंड संहिताचे कलम३७६(२)(n)३४५(d)(१)५००,५०६भादवी सह कलम ६७(अ)माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम २००० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहे.