आष्टी(श) प्रतिनिधी : येथील १७ जागेसाठी नगरपंचायत निवडणूक निकाल आज घोषित करण्यात आले असून यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले असून १ नगरसेवक ईश्वर चिठ्ठी जनशक्ती या स्थानिक राजकीय गटाच्या खात्यावर गेल्याने काँग्रेसचे पक्षाचे बहुमत १ मताने हुकले असून दुसऱ्या क्रमांकावर स्थानिक राजकीय गट म्हणून जनशक्ती पक्षाचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत तर भारतीय जनता पार्टीचे १७ पैकी फक्त २ नगरसेवक निवडून आल्याने भाजपचा धुव्वा वजा विजय झाला आहे तर बहुजन समाज पार्टीचा १ व १ अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या मीना डोईफोडे १२४ मते घेवून विजयी झाल्या असून दुसऱ्या क्रमांकावर जनशक्तीच्या गीता माहोरे यांना ८० मते आहेत प्रभाग क्र.२ मध्ये काँग्रेसच्या चित्रा पोहणे १४८ मते घेऊन विजयी झाल्या असून दुसऱ्या स्थानावर भाजपाच्या संगीता सुरजुसे यांना १३० मते आहे प्रभाग क्र.३ मध्ये स्थानिक जनशक्ती पक्षाचे रामकृष्ण सुरजुसे १७४ मते घेवून विजयी झाले असून दुसऱ्या स्थानावर १६५ मते घेवून काँग्रेसचे नरेंद्र मोकदम आहेत प्रभाग क्रमांक ४ मध्ये जनशक्ती पक्षाचे हुसेन शेख रेहान अख्तर विजयी असून त्यांना ११८ मते असून दुसऱ्या स्थानावर ९० मते घेवून काँग्रेसचे शेख एजाज कुरेशी अब्दुल आहेत प्रभाग ५ मध्ये काँग्रेसचे राहुल लाड २३४ मते घेवून विजयी झालेत तर दुसऱ्या स्थानावर भाजपाच्या अविनाश कदम यांना ११२ मते आहे प्रभाग क्रमांक ६ मध्ये काँग्रेसच्या रत्नमाला सुरपाम १०४ मते घेऊन विजयी झाल्या असून दुसऱ्या स्थानावर जनशक्तीच्या इंदुबाई सिरसाम यांना ८९ मते आहेत प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेसचे खा गौज खा याकुब १४५ मते घेवून विजयी झाले असून दुसऱ्या स्थानावर भाजपाचे अली नजीम अली हापिस असून त्यांना ८३ मते आहेत प्रभाग क्रमांक ८ मध्ये काँग्रेसच्या अहमद यास्मिन अंजुम सिराज १७७ मते घेवून विजयी झाल्या तर दुसऱ्या स्थानावर जनशक्ती पक्षाच्या तबस्सुम उजमा सय्यद राजिक यांना १४५ मते आहेत प्रभाग क्रमांक ९ मध्ये काँग्रेसच्या नुसरत परविन मुख्तार खान १२५ मते घेवून विजयी झाल्या तर दुसऱ्या स्थानावर भाजपाच्या योगिता भानेरकर यांना १२३ मते आहे या ठिकाणी फक्त २ मताचा विजय दिसून येत आहे प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसचे विपिन उमाळे व जनशक्ती पक्षाचे जॅकी रोशन अब्दुल हाफिज शेख या दोन्ही उमेदवारांना १४५ असे समसमान मते पडली शेवटी ईश्वर चिठ्ठीत जनशक्तीच्या जाकीर हुसेन, अब्दुल हाफिज शेख यांचा विजय झाला प्रभाग क्रमांक ११ मध्ये काँग्रेसचे योगेंद्र पोकळे १४५ मते घेवून विजयी झाले तर दुसऱ्या स्थानावर भाजपाचे दिग्गज उमेदवार अशोक विजयकर यांना १४० मते आहेत प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपाचे ऍड मनीष ठोंबरे २०८ मते घेऊन सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झालेत तर दुसऱ्या स्थानावर जनशक्तीचे दिगांबर मोकदम यांना १२२ मते आहेत प्रभाग क्रमांक १३ मध्ये जनशक्ती पक्षाच्या सीमा निंबेकर १४७ मते घेवून विजयी झाल्या तर दुसऱ्या स्थानावर भाजपाच्या संगीता निंबेकर यांना १०७ मते आहेत प्रभाग क्रमांक १४ मध्ये अपक्ष उमेदवार सीमा सत्पाल १६१ मते विजयी झाल्या तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या अनिता पाटील यांना ९२ मते आहेत प्रभाग क्रमांक १५ मध्ये जनशक्ती पक्षाच्या माधुरी सोनटक्के १३८ मते घेवून विजयी झाल्या तर दुसऱ्या स्थानावर धनश्री ढोले यांना १३१ मते आहेत प्रभाग क्रमांक १६ मध्ये बसपाच्या अर्चना विघ्ने १८१ मते घेवून विजयी झाल्यात तर दुसऱ्या स्थानावर जनशक्तीच्या छाया
आढे यांना १४९ मते आहे सर प्रभाग क्रमांक १७ मध्ये काँग्रेसचे अनिल धोत्रे २५८ मते घेवून विजयी झालेत तर दुसऱ्या स्थानावर भाजपचे विनोद गोहाड यांना १०८ मते आहेत सदर निवडणूक निकाल निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरकार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौतम शंभरकर व निवडणूक निरीक्षक सतीश भोसले यांच्या मार्गदर्शनात ४ टेबल वरून एकूण ५ फेऱ्यात ८ प्रशासकीय लोकसेवकात पार पडली