शिक्षणाच्या अभिनव अध्ययन- अध्यापन पद्धतीबाबत ऑनलाईन प्रशिक्षण

 

#Khabardarmaharashtra,letest news, social, politics,crime, corona#

आज दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी किड्स फाउंडेशन तर्फे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी ओपन सोर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म या मोफत ऑनलाइन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्कशॉपमध्ये ओ लॅब्स, व्ही – स्कूल, दीक्षा ॲप्स हे तीन कंटेंट घेऊन सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

ओपन सोर्स लर्निंग प्लॅटफॉर्म वर्कशॉप या प्रशिक्षणात ओ लॅब्स माध्यमातून विद्यार्थी विज्ञान व गणित हे विषय मनोरंजक पद्धतीने कशा पद्धतीने शिकू शकतात याबद्दल सखोल मार्गदर्शन शरद ढगे सर यांनी केले तसेच शिक्षकांना व्यवसायिक अहर्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दीक्षा ॲप चा उपयोग सांगण्यात आला. यामध्ये निष्ठा प्रशिक्षण जॉईन करायची, निष्ठा प्रशिक्षणामध्ये कसे लॉगिन करायचे, कोर्स पूर्ण कसा करायचा कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट कसे प्राप्त करायचे याबद्दल ची प्रात्यक्षिक शरद ढगे सर यांनी घेतली.
त्याच पद्धतीने इयत्ता पहिली ते दहावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी लॉक डाऊन च्या काळामध्ये स्वयंअध्ययन करण्याच्या दृष्टीने व्ही – स्कूल अँप स्वप्निल सर यांनी समजून सांगितली.या ॲपच्या मदतीने विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील तसेच त्यांना त्यांच्या इयत्तेचा संपूर्ण पाठ्यक्रम मनोरंजक पद्धतीने शिकता येईल, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुद्धा या ॲपच्या मदतीने करता येतात. सोबतच विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड सुद्धा याच्या मध्ये जतन करून ठेवले जातात. ही ॲप्स कशा पद्धतीने कार्य करीत असते या संदर्भात चे प्रात्यक्षिक कार्य स्वप्नील वैरागडे सर यांनी सर्वांसमोर सादर केले. प्रशिक्षणार्थी मध्ये विविध जिल्ह्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शाळा बंद पण शिक्षण सुरू ही संकल्पना घेत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या दृष्टीने सदर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थी व शिक्षक यांना स्वयंअध्ययन करण्याच्यादृष्टीने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा होता.
हे संपूर्ण प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध आहे तसेच यातील अनेक प्लॅटफॉर्म भारत शासन तसेच महाराष्ट्र शासनानी तयार केलेले आहेत त्यामुळे त्याची विश्वसनीयता उत्तम आहे. अशी देण्यात आले.सदर प्रशिक्षण विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना कितपत समजले यासाठी ऑनलाइन क्विज आयोजित करण्यात आली होती. उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना किड्स फाउंडेशन तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.तज्ञ मार्गदर्शक म्हणून शरद ढगे व स्वप्नील वैरागडे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल गिरडकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन मनीष जगताप यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी किड्स फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी मदत केली.