जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
वर्धा : अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरणात चौकशीमध्ये शाशकीय रुग्णालयातील गर्भपातातील औषध व इंजेक्शन प्राप्त झाल्याप्रकरनी डॉ तडस जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा व उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ सुटे यांना तात्काड निलंबन करून त्याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबत मा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आर्वी मार्फत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले
डॉ कदम हॉस्पिटल मध्ये अल्पवयीन मुलीचे गर्भपात प्रकरणात चौकधी दरम्यान शाशकीय रुग्णालयातील गर्भपातकरिता वापरण्यात आलेली औषधी व इंजेक्शन मोठ्या प्रमाणात मिळाली असून ती पोलीस तपासात जप्त करण्यात आली आहे
डॉ नीरज कदम हे कंत्राटी पद्धतीने उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे कार्यरत असतांना जिल्हा शल्यचीकिस्तक डॉ तडस उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ सुटे व डॉ नीरज कदम यांच्या संगनमताने शाशकीय औषधी खाजगी रुग्णालयात येऊन अफरातफर करून शाषणाची फसवणूक करण्यात आलेली आहे
डॉ नीरज कदम यांच्या रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय आर्वी मधील गर्भापाताची मोठ्या प्रमाणात मिळालेली औषधी इंजेक्शन याला सर्वस्वी जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा व अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आर्वी हे जबाबदार आहेत
जिल्हा शल्यचिकिस्तक वर्धा व अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आर्वी यांना खाजगी रुग्णालयाची तपासणी करण्याचे अधिकार आहे तपासणी दरम्यान ज्या त्रुट्या व दोषारोष आढळून आले त्याबाबत संबंधित रुग्णालयावर कारवाही करनेअवश्यक असतांना संबंधितांनी कारवाही केलेली नाही त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे करीता जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा व उपजिल्हा अधीक्षक यांना तात्काड निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींबर फौजदारी गुन्हे दाखल करन्यात यावे असे निवेदनातून म्हटले आहे