सौ.मंगलाताई ठक यांचा हिंगणघाट महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

 

वर्धा जिल्हयातील हिंगणघाट तालुका महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ.मंगलाताई ठक यांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा वर्धा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
सौ.मंगलाताई ठक यांनी गेल्या तीन वर्षांपासून महिला काँग्रेसच्या माध्यमातून हिंगणघाट तालुक्यासाठी मोठे योगदान दिले होते उपेक्षित घटकांना एकत्रित करून व सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्यांनी महिला काँग्रेसच्या माध्यमातून हिंगणघाट तालुक्यात मोठे काम उभे केले होते.
सद्या त्या जेष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून वृद्धांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्रभर फिरून करत आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांनी राजीनामा का दिला याचे कारण समजू शकले नाही.