
आतापर्यंत 12 कवट्या अन् 54 हाड व सोनोग्राफी मशीन पेशंट एन्ट्री रजिस्टर जप्त
आर्वी :दि. 15-01-2022 रोजी डॉक्टर कदम हॉस्पिटल आर्वी येथे RIR No. 25/22 च्या अनुषंगाने ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन आर्वी येथील टीम डॉक्टर कदम यांच्या घराची झडती करत असताना झडती दरम्यान एका वन्य प्राण्यांची कातडी सापडल्याचे पिदुरकर साहेब यांनी माहिती कळविली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी नितीन जाधव व वनकर्मचारी घटनास्थळावर जाऊन सदरची वन्यप्राण्यांची कातडी जप्त करून वन गुन्हा क्रमांक 3/22 दि.15-01-2022 अन्वये नोंदविला आहे. सदर प्रकरणी शेपटे साहेब उप वनसंरक्षक वर्धा बोबडे साहेब सहाय्यक वनसंरक्षक( प्रादे व कॅम्पो) वर्धा यांच्या मार्गदर्शनात संशयास्पद गुन्हा नोंदविला आहे. मात्र नेमके कोणत्या प्राण्याची कातडी आहे. हे प्रयोग शाळेत पाठवल्या नंतरच कळेल त्यानंतरच पुढील आरोपींविरुद्ध कारवाई होईल असे
पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती वनसंरक्षक अधिकारी नितीन जाधव यांनी दिली.
वनसंरक्षक अधिकारी श्री एन एस जाधव आर्वी वनपरिक्षेत्रातील टीम पुढील तपास करीत आहे.
या गर्भपात प्रकरणात धक्कादायक प्रकार आणखी काहीतरी वेगळे पुढे येत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
याची सखोल चौकशी होईल पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथील डॉ. मोहन सुटे व फॉरेन्सिक टीम आरोग्य विभाग नागपूर यांची शोध मोहीम सुरू आहे.
आतापर्यंत 11 कवट्या अन् 54 हाड व सोनोग्राफी मशीन पेशंट एन्ट्री रजिस्टर जप्त केले आहे. मात्र काही नवीन वेगळे अवशेष आढळून येते का? याचा शोधाशोध सुरू आहे.