माजी आमदारांकडून नुकसानग्रस्त शेतपिकांची भागाची पाहणी शाशणाकडे पाठपुरा करण्याचे आश्वासन

 

 

दि.८ व ९ जानेवारी रोजी अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.दि.१० जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांनी आर्वी तालुक्यातील नांदपूर व लाडेगाव येथे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.ह्यावेळी बैलटांग्यावर बसून परिसरात पाहणी केली.संत्रा,गहू,तूअर,कापूस आणि चण्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले आहे.अमरभाऊ काळे यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना धीर मिळाला.त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार अमरभाऊ काळे यांनी सांगितले.ह्यावेळी शेतकरी,काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.