सामान्य रुग्णालयात डॉ.शानगोंडा यांच्याकडे फीडींग प्लेट उपचाराची सुविधा

जन्मतःच अनेक लहान बालकांच्या ओठ आणि टाळूमध्ये फट आढळून येते ज्यामुळे बाळाची दुध पिण्याची क्षमता कमी होते,त्यासाठी आता जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा दंतचिकित्सक डॉ.चंद्रशेखर शानगोंडा यांच्या प्रयत्नाने फ्लीडींग प्लेट बसवण्याची सुविधा देण्यात येत आहे.
ही सुविधा सामान्य रुग्णालयात येण्यापूर्वी यावरील उपचाराकरिता जिल्ह्यातील अनेक रुग्ण हजारो रुपये खर्च करून नागपूर येथे उपचारासाठी जात होते मात्र फीडिंग प्लेटची व क्लेफ्ट लीप आणि पॅलेट सुविधा आता जिल्हा दंतचिकित्सक डॉ.चंद्रशेखर शानगोंडा यांच्या प्रयत्नाने येथेच देता येईल त्यामुळे रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ..चंद्रशेखर शानगोंडा यांनी केले आहे.

अलीकडे जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात अनेक तज्ज्ञ असे वैद्यकीय अधिकारी लाभून अनेक दर्जेदार आधुनिक सुविधा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मिळत आहेत.त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांवर देखील उपचार करणे आता जिल्हा रुग्णालयात शक्य होत आहे.
क्लेफ्ट लीप आणि पॅलेट व फीडिंग प्लेटची सुविधा जिल्ह्यातील लोकांना मिळावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.चंद्रशेखर शानगोंडा यांनी विशेष प्रयत्न केले.याबरोबरच हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी महिला व बाल रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सोयाम ,दंत तंत्रज्ञ सुनील भिसे,दंत आरोग्य सेविका रीना मेश्राम आणि डी.ई.आय. सी.चे प्रशांत खोब्रागडे यांच्यासह जिल्हा दंत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ही सुविधा आता सामान्य रुग्णालयात प्रदान करण्यात येत आहे.

 

 

जन्मतः काही बाळांच्या ओठ आणि टाळू यामधे असलेल्या विकारामुळे बाळाला स्तनपान करण्यास अडचण जाते मात्र क्लेफ्ट लीप आणि पॅलेट व फीडिंग प्लेटची सुविधेमुळे आता या समस्येवर निराकरण करता येते.
         डॉ.चंद्रशेखर राममूर्ती शानगोंडा
जिल्हा दंतचिकित्सक,सामान्य रुग्णालय,गडचिरोली