निकॉन DSLRD7500 कंपनीचा व्हिडीओ कॅमेरा चोरणारा आरोपी गजाआड

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की यश रमेशराव राऊत वय 21 वर्षे रा. विजयगोपाल ता.देवळी जि.वर्धा.ह. मु. हवालदारपुरा वर्धा यांनी पो.स्टे. ला तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक 09/01/2022 रोजी साक्षगंधचा कार्यक्रम असल्याने सांयकाळी 6/00 वाजता दरम्यान मौजा कोरा येथे निघुन गेला तेव्हा त्यांचे किरायाचे रुमला कोणतेही कुलूप लावले नवते त्यांचे रुमचे खाली लोखंडी गेट असल्याने उघडे रहाते दि 10/02/2022 रोजी दुपारी 12/00 वाजता फिर्यादी त्यांचे रुम वर परत आले असता त्यांचे रुम मध्ये ठेवून असलेला निकॉन DSLRD7500 कंपनीचा व्हिडीओ कॅमेरा किंमत 50,000 रुपये किमतीचा रूम मध्ये दिसला नाही फिर्यादीचा व्हिडोओ कॅमेरा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे अशा फिर्यादीने तोंडी रिपोर्ट पोलीस स्टेशन ला दिली असता अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला

सदर पोलीस गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडून खात्रीशिर मिळालेल्या माहीती वरुन दिनांक 10/01/2022 रोजी आरोपी नामे साहील जिवनराव दारने वय 20 वर्षे रा.आकोली ता.सेलु जि. वर्धा यास ताब्यात घेवून पंचा समक्ष सदर गुन्हयातील निकॉन DSLRD7500 कंपनीचा व्हिडीओ कॅमेरा किंमत 50,000 रुपये चा चोरुन नेल्याचे कबुली दिल्याने जप्त करुन सदरचा गुन्हाउघडकीस आणला

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर ,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप तसेच पो.नि.सत्यविर वंडीवार यांचे निर्देशनानुसार पो.स्टे. वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. राजेश राठोड पो. अंमलदार अरविंद घुगे दिनेश राठोड़ यांनी केली आहे.