जिल्हयात 54 हजार शेतक-यांना 630 कोटींचे पिककर्ज वाटप

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक कर्ज वाटप

 जिल्हाधिका-यांकडून बँकर्स समितीचा आढावा

वर्धा, दि. 11:-शेतक-यांना खरीप व रब्बी हंगाम चांगल्या पध्दतीने घेता यावा यासाठी बँकांच्या वतीने अल्प दरात दरवर्षी पिककर्जाचे वाटप करण्यात येते. यावर्षी आतापर्यंत 54 हजार शेतक-यांना 630 कोटी रुपयांच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पिककर्जासह जिल्हास्तरीय बँकर्स समितीचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिका-यासह मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण मुळे यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे जिल्हा स्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील पात्र शेतक-यांना पिककर्ज मिळाले पाहिजे एकही शेतकरी या पासुन वंचित राहू नये अशा सूचना बँकर्स समितीच्या वतीने सर्व बँकांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे बँकांनी केलेल्या कर्ज वाटपाचा जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. जिल्हयात बँक ऑफ इंडियांनी सर्वाधिक 201 कोटी रुपयांचे 19 हजार 500 शेतक-यांना कर्जाचे वाटप केले आहे. त्याखालोखाल स्टेट बँक ऑफ इंडियाने 180 कोटी रुपयाचे 16 हजार 20 शेतक-यांना केले आहे.
ॲक्सीस बँक 2 कोटी 50 लाख, बँक ऑफ बडोदा 22 कोटी 80 लाख, बॅक ऑफ महाराष्ट्र 90 कोटी, कॅनडा बँक 15 कोटी, सेट्रल बँक ऑफ इंडिया 22 कोटी, इंडियन बँक 13 कोटी 50 लाख, एचडीएफसी बँक 21 कोटी 80 लाख, आयसीआयसीआय बँक 5 कोटी 40 लाख, आयडीबीआय बँक 3 कोटी 21 लाख, इंडियन ओव्हरसीस बँक 1 कोटी 27 लाख, पंजाब नॅशनल बँक 26 कोटी 55 लाख, युको बँक 1 कोटी 73 लाख, युनियन बँक 20 कोटी 36 लाख तर विदर्भ कोकण ग्रामिण बँकेने 14 कोटी पिककर्जाचे वाटप केले आहे.
31 शाखांचे 100 टक्के कर्ज वाटप
खरीप हंगामात काही बँकेच्या शाखांनी दिलेल्या उद्ष्टिापेक्षा जास्त तर काहीनी दुप्पट कर्ज वाटप केले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी या शाखांचे कौतूक करत इतर शाखांनी सुध्दा याचे अनुकरण करावे, अशा सूचना केल्या आहेत. 100 टक्के पेक्षा जास्त कर्ज वाटप करणा-या शाखांमध्ये बँक ऑफ इंडियाच्या अंतोरा, आष्टी, देवळी, जाम, कांढळी, कानगाव, कारंजा, मांडगाव, मोरांगना, पोहणा, साहूर, सिंदी रेल्वे, सुकळी बाई व तळेगाव या शाखांचा समावेश आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोरा आणि नंदोरी, कॅनरा बँकेच्या बरबरडी आणि हिंगणी , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कारंजा, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा, गिरड, विरुळ, गिरोली, युनियन बँक इंडिया शाखा वर्धा, विदर्भ कोकण ग्रामिण बँक शाखा वर्धा, देवळी व कारंजा शाखेने 100 टक्के कर्ज वाटप केले आहे.