
जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ओंनलाईन दीव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी नगर परिषद आर्वी द्वारे गांधी विद्यालय आर्वी येथे दिनांक 10/01/2022 व दिनांक 11/01/2022 ला दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलेले असून त्या करिता शहरात लाऊड स्पीकर द्वारे शुध्दा प्रसिध्दी करण्यांत आलेली असून जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा…
सदरच्या शिबिरात दिनांक 10/01/2022 ला मा.प्रशासक तथा उपविभागीय. अधिकारी आर्वी व मा.मुख्याधिकारी नगर परिषद आर्वी यांचे हस्ते उद्घाटन करण्यांत आले असून जवळपास 65 दिव्यांग नागरिकांनी नोद केली आहे. तसेच आज दिनांक 11/01/2022 ला दुपार पर्यंत 101 नागरिकांची नोंदणी करण्यांत आली..
सदरचे दोन दिवसीय शिबीर मध्ये श्री.रणजीत पवार उपमुख्याधिकारी नगर परिषद, भाग्यश्री चांदोरे, गजानन गायकवाड, संजय अंभोरे, सुहास ठाकरे, सुनील आरीकर, सुरेंद्र चोचमकर,शांतनू भांडारकर,अरुण पंड्या, रंजीत गोयर नगर परिषद आर्वी ,तसेच समीक्षा खोडे, अनिल पेंडाम ,रोशन राऊत, निखिल खोडे, रवी कांबळे, कृष्णा बिडकर,माया खारकाटे, ज्योती हत्तीमारे आदी लोकांनी सदरचे शिबीर यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम केले