कोरोना नियंत्रणासाठी जिल्हयात नविन निर्बंध जाहीर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 दिवसा जमावबंदी तर रात्री फिरण्यास मनाई

 शाळा, महाविद्यालय 15 फेब्रुवारी पर्यंत बंद

 जीम, हेअर सलूनला 50 टक्के उपस्थिती

 क्रिडा स्पर्धा, पर्यंटन स्थळे बंद राहणार

वर्धा,  :- कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिका-यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे नविन निर्बंध जाहीर केले आहे. या निर्बंधांची जिल्हयात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल, पोलिस व सर्व संबंधित विभागाना देण्यात आले असून तसे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहे.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधानुसार जिल्हयात सकाळी 5 ते रात्री 11 वाजे पर्यंत 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र गोळा होता येणार नाही. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत फिरण्यास बंदी राहील. खाजगी कार्यालय कोविड नियमाचे पालन करत 50 टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीसह सुरु राहतील. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना केवळ अत्यावश्यक कामासाठी पुर्व परवाणगीनेच प्रवेश राहील. शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग दि.15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. शिक्षण मंडळाचे दहावी व 12 वीचे उपक्रम मात्र घेता येतील. जलतरण तलाव, स्पा व वेलनेस सेंटर पुर्णपणे बंद राहतील. जीम कोविड नियमाचे पालन करत 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.
केशकर्तनालय, ब्युटीसलून 50 उपस्थितीने कोविड नियमाचे पालन करत सुरु राहतील. या ठिकाणी काम करणा-या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. जिल्हा, तालुका क्रिडा स्पर्धा शिबिरे व क्रिडा कार्यक्रम आयोजनावर बंदी राहील. मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, गडकिल्ले, तिकिट असलेली ठिकाणी, पर्यंटन स्थळे बंद राहणार आहे. शॉपींग मॉल, बाजारसंकुल, रेस्टॉरंट, भोजनालय, नाटयगृह, सिनेमागृह यांना कोरोना नियमांसह 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवाणगी आहे. मात्र रात्री 10 सकाळी 8 पर्यंत बंद राहील. खाद्य पदार्थांची घरपोच सेवा मात्र सुरु राहतील. यासाठी संबंधितांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
विवाह सोहळे, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय कार्यक्रमांना 50 लोकांना तर अत्यंविधींना 20 लोकांना उपस्थितीला परवाणगी राहील. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणा-यां प्रवाश्याचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील. या निर्बंधामधून अत्यांवश्यक सेवांना मात्र सूट राहील. या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबंजावणीसाठी तहसिलदार, मुख्याधिकारी, पोलिस निरिक्षक यांच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निर्बंधाचे उल्लघन करणा-यांवर दंड सुध्दा आकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी आदेशात नमुद केले आहे.