गांधी चौकातील जयस्तंभ दुरुस्ती करिता तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन

 

 

प्रतिनिधी// खबरदार महाराष्ट्र 

नितिन आष्टीकर राष्ट़्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालूका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तहसिलदार साहेब आर्वी यांच्या मार्फत आर्वी येथील गांधी चौकातील जयस्तंभ दुरुस्ती करण्या बाबत श्री प्राजक्ता तनपुरे, राज्यमंत्री, नगर विकास महाराष्ट्र तसेच वर्धा जिल्हयाचे मा.श्री रामदास रामदासजी तडस व मा.श्री दादारावजी केचे आमदार आर्वी विधानसभा, मुख्याधिकारी साहेब, आर्वी यांना निवेदन देण्यांत आले.
आर्वी शहरातील हृदयस्थान असलेले गांधी चौकात जयस्तंभ बनविले आहे. या जयस्तंभाचे ग्रेनाईट निघालेले आहे. तसेच बरेच ठिकाणी जयस्तंभ तुटलेले आहे.
जयस्तंभाला लागलेले स्वातंत्र्याच्या तारखेचे प्लेट तारिख चुकीची दिसत आहे. ते पण दुरुस्त करण्यांत यावे. तसेच जयस्तंभाच्या टोकावर पिंपळाचे झाड लागलेले असून ते काढण्यांत यावे.
ही दुरुस्ती २६ जानेवारी २०२२ च्या अगोदर झाल्यास देशातील हुतात्म्यांना खरी श्रध्दांजली होईल.
हे निवेदन देतांना राकेश एलचटवार माजी नगर सेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रविण शर्मा, स्वप्नील बोबडे, राजेंद्र नेवारे, सर्वेश देशपांडे, राजू शिरगरे, शैलेष तलवारे, रविंद्र खंडारे, रज्जक अली, महेंद्र मात्रे, प्रकाश भोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.