आर्वी शहरातील प्रसिद्ध महिला डॉक्टरला अटक मोठी रक्कम घेऊन केला अल्पवयीन मुलीचा गर्भपात

 

प्रतिनिधी // लखन दाभने

आर्वी : वर्ध्यात आर्वी येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी सकाळी रीतसर महिला डॉक्टरला अटक केली असून
संगोमत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ
डॉ. रेखा कदम असं नाव आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला मिळालेल्या माहितीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सुत जुळले मुलगा साडे सतरा वर्षाचा आहे. तर मुलगी तेरा वर्षाची आहे. या दोघांचे सुत जुळल्याने यात मुलीला गर्भधारणा झाली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावरून पोलिसांनी रात्रीच रीतसर परवानगी घेऊन लगेच कारवाई करण्याच्या हालचाली केल्या मात्र रात्री घर व दवाखाना बंद असल्यामुळे पोलिसांना रात्रभर पाळत ठेवावी लागली आणि सकाळी डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे व पथकाने अटक केली.
प्रकरणात पास्को अंतर्गत व बेकायदेशीर गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आधी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पास्को सेलच्या उपनिरीक्षक जोत्सना गिरी या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

महिला डॉक्टरने तीस हजारात केला गर्भपात

अल्पवयीन मुलगी पाच महिन्याची गर्भवती होती. तिचा गर्भपात करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे आई वडील आणि शहरातील स्त्री रोग तज्ञ डॉ. रेखा कदम यांनी त्यांच्याकडून 30 हजार रकमेत गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे