भीषण अपघातात 6 जण जागीच ठार व 8 गंभीर जखमी

 

बातमी संकलन // उमंग शुक्ला (खबरदार महाराष्ट्र)

#khabardarmaharashtr#online news#letest uodate# social# sport# crime#korona#

एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना बीडमधून समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात आज सकाळच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई रोडवर घडला आहे.
काल सकाळी लातूर आगारातून लातूर-औरंगाबाद ही बस निघाली होती दरम्यान आंबेजोगाईवरून लातूरच्या दिशेने प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक जात होता. यावेळी बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. नेमके या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गोधंळ उडाला आहे.
यावेळी जवळपास असणाऱ्या नागरिकांनी बचाव कार्य केले. पोलिसांनी तात्काळ घडनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य चालू आहे. तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले असून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसचा संप चालू आहे. मात्र काही आगारातून तुरळक बस रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. राज्यात काल काही ठिकाणी एसटीचे स्टेअरिंग अप्रशिक्षित चालकाच्या हाती दिल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या लालपरीचे स्टेअरिंग नेमके कोणाच्या हातात आहे हा प्रश्व यावून उपस्थित होत आहे.