माजी आमदारांकडून शेतपिकांची झालेल्या नुकसानाची पाहणी नुकसान भरपाई मिळवून देन्या करीत पाठपुरावा करणार अशे आश्वासन  

 

 

दि.८ व ९ जानेवारी रोजी अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.दि.९ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांनी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा,गुमगाव आणि आष्टी तालुक्यातील खडकी, परसोडा, सिरसोली येथे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.संत्रा,गहू,तूअर,कापूस आणि चण्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले आहे.त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार अमरभाऊ काळे यांनी सांगितले. ह्यावेळी जिल्हा कृषी अधिकारी,काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.