वर्धा :
श्री.संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन वर्धा द्वारा माँ अनुसया सेलिब्रेशन हॉल नालवाडी येथे आयोजित आज दि. ०९/ ०१/२०२२ च्या तेली समाज वधु-वर परिचय मेळाव्या च्या कार्येक्रमा निमित्त तेली समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये वर्धा जिल्ह्यातील समाजसेवक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला क्षेत्रातील त्यामधे धडाधडीचे समाजकार्य महिलांचा, मुलींचा, पुरुषांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या मधे
व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देणारी, महाराष्ट्रामध्ये कमी वयामध्ये ओळख निर्माण करणारी, असंख्य पुरस्काराची मानकरी, युवा समाजसेविका शिक्षिका, कोरोग्राफर, वर्धा येथील ओजळ बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कु.प्राजक्ता मुते यांनचा सत्कार वर्धा विधानसभा क्षेत्राचे खासदार मा. रामदासजी तडस, आमदार रामदासजी आंबटकर , माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सुधीर चाफले, निळकंठ पिसे,यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कु.प्राजक्ता मुते यांनी
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन समाज सेवेचा ठसा उमटविला. कू प्राजक्ता मुते या ८ वर्षापासून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करीत आहे , सोबतच करोना महामारी असो ,अथवा कोल्हापूरचा पूरग्रस्त असू, विद्यार्थ्यांसाठी निशुल्क उन्हाळी शिबिराचे आयोजन करून, स्वतंत्र पने औजळ बहुद्देशीय संस्था चालवित आहे ,
21 व्या शतका मध्ये युवा पिढी वेगवेगळ्या वळणला लागली आहे , परतू तीच युवा एक मुलगी महुनन समजा साठी आदर्श ठरत आहे ,
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन श्री संताजी जगनाडे महाराज फाउंडेशन यांनी केले होते,