भाजयुमो तर्फे विद्यापीठ विधेयकाचा विरोधात मा.मुख्यमंत्र्यांना पाठवणार 20000 पत्र

 

प्रतिनिधी //सारंग नेवरे

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
आज दि.९जानेवारी २०२२ रोजी भाजयुमो शहर अध्यक्ष श्री मोहित उमाटे यांच्या नेतृत्वात मनमर्जीने विद्यापीठ विधेयक कायदा पारित करून घेतल्याबद्दल त्याचा निषेध म्हणून
वर्धा येथील पोस्ट ऑफिस येथुन पत्र पाठविण्यात आले.
पवित्र विद्यापीठाना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका,विद्यापीठ सुधारणा विधेयक त्वरित मागे घावे.असे या पत्रद्वारे मागणी करण्यात आली.
आज पासून जिल्ह्यातील सर्व मंडळातुन मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात सुरवात केली जाणार. किमान जिल्ह्यातून 20000 पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे शहर अध्यक्ष मोहित उमाटे यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमोचे महामंत्री चेतन गुजर, भाजयुमो उपाध्यक्ष सारंग नेवरे, भाजयुमो उपाध्यक्ष सागर भारस्कार , सुमीत मस्के, वेदांत कुंबलवार ,शिवोम देशमुख इतर भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.