गडचिरोली जिल्हयात 30 कोरोनाबाधित, 

 

गडचिरोली,दि.9: आज गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 नविन कोरोना बाधित झाले असून 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30998 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30104 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 147 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.47 टक्के तर मृत्यू दर 2.41 टक्के झाला आहे. आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 21, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, आणि मुलचेरा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 02 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, आणि एटापल्ली तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.