पोलीस कन्स्टेबलची खलबत्त्याने ठेचून हत्या हत्या करणारे घरातील सदस्यच

 

Khabaradarmaharashtra# online news# social#sports# crime#corona#letest update

पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची त्यांच्या कल्याणमधील राहत्या घरी हत्या झाली आहे. ही हत्या पत्नी आणि मुलीने केल्याचे उघड झाले आहे. कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक हिरा पन्ना अपार्टमेंट येथे प्रकाश बोरसे हे आपली पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री सोबत राहत होते. प्रकाश बोरसे हे मुंबई येथील कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रकाश बोरसे घरी आले. त्यांचा पत्नी आणि मुली सोबत वाद झाला.

या वादातून दोघींनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांना जखमी केले. या हल्ल्यात प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून एका बाजूला बसून होते. जवळपास चार तास दोघी घरात बसून होत्या. बोरसे यांच्या घराबाबतची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली. त्यानंतर, हा प्रकार उघड झाला.