श्री संत भानुदास महाराज संस्थान वर्धमनेरी अंतर्गत कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्ररोग शिबीर संपन्न

 

आर्वी, प्रतिनिधी/ अभिषेक शुक्ला

आर्वी : वर्धमनेरी येथे श्री संत भानुदास महाराज संस्थान वर्धमनेरी अंतर्गत कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्ररोग तपासणी शिबीर दि. 08/01/2022 रोजी संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन श्री. संत भानुदासजी महाराज यांनी केले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. अजय कुमार शुक्ला (नेत्ररोग तज्ञ) यांनी भूषविले मंचावर उपस्थित डॉ. यादव सर, डॉ. यादव मॅडम, डॉ. अश्विनी मॅडम, डॉ अंजली मॅडम डॉ. मोहन सुटे यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या.
कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथील नेत्र विभागातील आठ डॉक्टर्स आणि टेक्निशन यांनी संस्थेच्या मंगल कार्यालयात कोरोनाची सर्व नियम पाळत शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात नेत्र तपासणी करिता 300 च्यावर रुग्णांची नोंद घेऊन ऑपरेशनची आवश्यकता असलेल्या 130 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आले.
तसेच नेत्र तपासणी करून ऑपरेशनची आवश्यकता नसलेल्या काही गरजू रुग्णांना मोफत चष्मे देऊन रूग्णांसाठी सोय उपलब्ध करून दिली.
श्री संत भानुदास महाराज संस्था ही सेवाभावी संस्था असून परिसरातील गरजू व्यक्तींसाठी दरवर्षी वेगवेगळ्या रोगनिदान शिबिराचे आयोजन करत असतात.
शिबिराच्या आयोजनाकरिता संस्थेचे (अध्यक्ष) श्री राजू भाऊ मालानी, (उपाध्यक्ष) श्री रामजी टावरी (सचिव) निमकर सर, (सहसचिव) हरिदास देशमुख, (कोषाध्यक्ष) सुहास गभने आणि मार्गदर्शक नितीन गभने, चंद्रकांत पोतदार, डॉ. जाने सर, साखरे सर, नेहारे सर, देशमुख सर, विघ्ने सर, नानने सर, गोटाणे सर, सावरकर सर व सर्व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी करिता मोलाचे सहकार्य केले.