महत्वाची बातमी राज्यात नवीन नियमावली जाहीर काय सुरू काय बंद सविस्तर वाचा

 

बातमी संकलन // उमंग शुक्ला (खबरदार महाराष्ट्र)

 

राज्य पुन्हा एकदा लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर आला असुन राज्य शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नविन नियमावली जाहिर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी नागरिकांसाठी नविन अटी जाहिर करतानाच जनतेला नियमाचे पालन करण्याचे तसेच कोरोनाचे दुत होऊ नका असे आवाहन केले आहे.राज्यात दिवसा जमावबंदी जाहिर करण्यात आली असुन रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत खेळाची मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे, जलतरण तलाव, जिम, स्पा बंद करण्यात आले असुन राज्यात रात्रीची संचारबंदी जाहिर केली आहे, म्हणजेच राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे.राज्यातील सलून, खाजगी कार्यालये 50% क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. लग्न तसेच अंत्यविधीसाठी 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील शाळा तसेच महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शॉपिंग मॉल्स 50% क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार असुन हॉटेल्स व रेस्टॉरंट वर देखिल कडक नियम लागू झाले आहेत त्यानुसार ह्या आस्थापना 50% क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या अस्थापनांना सुट देण्यात आली आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना ह्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

आज राज्यात कोरोनाचा आगडोंब उसळला असुन एका दिवसात राज्यात कोरोनाचे तब्बल 40000 च्या वर रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारने तडकाफडकी निर्णय घेत मिनी लॉकडाऊन जाहिर केला आहे हे विशेष.