चोरीची मोटरसायकल जप्त व चोराला घातल्या बेड्या

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

: सविस्तर वृत्त असे की तक्रारदार दिनेश वसंतराव शंभरकर, वय ३४ वर्षे काम ठेकेदारी रा. आदर्श नगर, जिवक बुध्द विहाराजवळ, संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट यांनी पो.स्टे. ला तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक ०७/०१/२०२२ रोजी १०.३० ते ११.०० वाजता दरम्यान त्यांनी त्यांची हिरोहोंडा स्प्लेन्डर मोटारसायकल क्रमांक एम. एच. ३२ / एल / २५५२ काळे रंगाची व निळा पटटा असलेली जिचा चेसिस क्रमांक 06H16CQ2449 असा असुन इंजीन क्रमांक 06H15M02622 असा असलेली किंमत २६.०००/- रूपये किमतीची कारंजा चौक हिंगणघाट येथे चाबी लावुन उभी केली असता अज्ञात इसमाने चोरून नेली. अश्या तोंडी रिपोर्टवर पो.स्टे.ला अप. क्रमांक ४९/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

गुन्हयाचे तपासात ठाणेदार श्री. संपत चव्हाण यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांना गुन्हयासंबंधाने मार्गदर्शन करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पो हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने तात्काळ शोध मोहीम व तपास सुरू करून आरोपी नामे महेश नामदेवराव तळवेकर वय २९ वर्षे रा. आसोला (नंदोरी) त. समुद्रपुर जि. वर्धा ह.मु. वाघोली यास निष्णण केले. त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३२ / एल / २५५२ काळे रंगाची व निळा पटटा असलेली जिचा चेसिस क्रमांक 06H16CQ2449 असा असुन इंजीन क्रमांक 06H15M02622 असा असलेली किंमत २६,०००/- रूपये किमतीची जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्षा श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्षा, श्री दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार पोउपनि सोमनाथ टापरे, पोउपनि बी.एस. मुंडे यांचे समवेत गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे आणी उमेश बेले यांनी केली.