त्या मोटर सायकल चोरट्याला पोलिसांनी केली अटक एकूण 8 मोटरसायकल जप्त

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी आशिष अशोकराव ढोले हे दि.20.12.2021 रोजी दुपारी 12.30 वा. चे सुमारास दत्त मंदिर चौक, वर्धा येथे त्यांची लाल रंगाची ऍक्टिव्हा मोपेड गाडी क्र. MH -32 -S- 8021 उभी करून भाजी घेण्यासाठी गोलबाजारात गेले व भाजी घेऊन काही वेळा नंतर परत आले तर तेथे त्यांना त्यांची मोपेड गाडी दिसून आली नाही. म्हणून त्यांनी पो. स्टे. वर्धा शहर येथे चोरीची तक्रार दिली त्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

स्था. गु. शा. वर्धा मार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून यातील अटक आरोपी रोहित डोंगरे रा. नागपूर याला पुलगाव येथून सदर गुन्ह्यातील ऍक्टिव्हा गाडीसह ताब्यात घेऊन त्याला आणखी सखोल विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने माहिती दिली की, त्याचा मित्र प्रणव संजय ठाकरे रा. खामला, नागपूर हे दोघेही जेल मधून सुटल्यानंतर त्यांनी दोघांनीही मिळून मागील 4 महिन्याचे कालावधीत खामला, प्रताप नगर, बेलतरोडी, बुटटीबोरी, हिंगणा परिसरातून 7 दुचाकी वाहने चोरून आणल्याचे कबूल केले व त्याने दिलेल्या माहितीवरून वेगवेगळ्या प्रकारची एकूण 7 दुचाकी वाहने सदर तपास दरम्यान जप्त करण्यात आली आहे.
सदर जप्त वाहनांबाबत संबंधित पोलीस स्टेशन ला गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले आहे.

या प्रमाणे मोटर सायकल चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
यातील दोन्ही आरोपी हे मोटर सायकल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बेलतरोडी, सोनेगाव, प्रतापनगर, तहसील, यवतमाळ येथे गुन्हे नोंद आहेत.आरोपी क्र 1 यास रितसर अटक करुन पुढील तपासकामी पो. स्टे. वर्धा शहर चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाही मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक वर्धा, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, पो.नि. श्री. संजय गायकवाड, सपोनि. महेंद्र इंगळे स्था. गु. शा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोउपनि. गोपाल ढोले, सौरभ घरडे, पो. हवा.निरंजन वरभे, हमीद शेख,नरेंद्र डहाके, रणजित काकडे, चंद्रकांत बुरंगे, प्रमोद पिसे, राजेश तिवसकर, श्रीकांत खडसे, मनिष कांबळे, रामकिसन इप्पर,अभिजित वाघमारे, प्रदीप वाघ,अमोल ढोबाळे, पवन पन्नासे, चालक अखिल इंगळे व सायबर सेल चे दिनेश बोथकर यांनी पार पाडली आहे.