@ ६ जानेवारी @ राष्ट्रीय पत्रकार दिन

 

आज पत्रकार दिन !

सर्व पत्रकार बंधुना हार्दीक शुभेच्छा !

६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. १९६४ पासून दरवर्षी ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.

पत्रकारिता ही सार्वजनिक जीवनाशी निगडीत असून सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात; परंतु याकडे दुर्लक्ष करून ज्या पत्रकारिता क्षेत्राने आपल्याला उभे केले त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलेच पाहिजे.

काळानुरूप विकासाच्या व्याख्या बदलत असतात. त्यामुळे आपणाला नक्की कोणत्या प्रकारचा विकास हवाय, याचे भान पत्रकारांनी ठेवण्याची गरज आहे. पत्रकारिता करत असताना बाळशास्त्री जांभेकरांचे आदर्श बाळगणे गरजेचे आहे.

सोशल मीडियासह अन्य पर्यायी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्या स्वीकारण्यातील अडचणी, आदी सर्व बाबी पत्रकारितेत काम करणाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या आहेत.

आजच्या पत्रकार दिनी सर्व पत्रकार बांधवाना शुभेच्छा

उमंग शुक्ला
खबरदार महाराष्ट्र टीम